new-img

कापसाला आज काय भाव मिळाला?

कापसाला आज काय भाव मिळाला? 

कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासुन सुधारणा आली आहे, सध्या बाजारसमितींमध्ये कापसाला सरासरी दर हा ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांचा मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २४ एप्रिल रोजी देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत कापसाला सरासरी दर हा ७ हजार ५०० रुपये मिळाला असुन या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ७ हजार तर जास्तीतजास्त दर हा ७ हजार ८०० रूपये मिळाला आहे. उमरेड बाजारसमितीत कापसाला सरासरी दर हा ६९०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत १२४ क्विंटल कापसाची आवक झाली आहे.

कापसाच्या दरात काहीशी सुधारणा आल्याने कापुस उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे.