new-img

कांद्याची आवक वाढली, काय मिळतोय बाजारभाव?

कांद्याची आवक वाढली, काय मिळतोय बाजारभाव? 

गेल्या अनेक दिवसांपासुन कांदा दर दबावात आहे. बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढली असुन दरात सतत घसरण होत आहे. यंदा दुष्काळामुळे कांदा उत्पादन १६ टक्क्यांनी घटले आहे. कांद्याला सरासरी भाव आजही १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार कांद्याला २५ एप्रिल रोजी सरासरी दर हा मुंबई कांदा-बटाटा मार्केट मध्ये १ हजार ४५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत आवक ही ९ हजार ३२० क्विंटल कांद्याची झाली आहे. पुणे-पिंपरी बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव हा १२०० रुपये मिळाला असुन या बाजारसमितीत ६ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ९०० ते जास्तीत दर हा १ हजार ५०० रूपये मिळाला आहे.

कांदा दरात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. बाजारअभ्यासकांच्या मते यंदा निवडणुका होईपर्यंत कांद्याचे दरात अशीच चढउतार राहण्याची शक्यता आहे.