new-img

बाजारसमितीत सोयाबीनला मिळतोय हमीभाव

बाजारसमितीत सोयाबीनला मिळतोय हमीभाव

गेल्या अनेक दिवसांपासुन सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. काही बाजारसमितीत सोयाबीनला हमीभावदरम्यान देखील दर मिळत आहे. सोयाबीन घसरत्या भावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

२५ एप्रिल रोजी सोयाबीनला वरोरा-शेगाव बाजारसमितीत सरासरी दर हा ३ हजार ५०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. सर्वात कमी दर या बाजारसमितीत मिळाला असुन सोयाबीनची आवक ही ३७ क्विंटल झाली आहे. त्यानंतर वरोरा-खांबाडा बाजारसमितीत सोयाबीला ३९०० रूपये दर मिळाला असुन या बाजारसमितीत ४१ क्विंटल आवक झाली आहे.

 सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहीलं आहे. त्यामुळे सोयाबीन विकावी का ठेवावी या विचाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत.