new-img

टोमॅटोच्या भावात घसरण, उत्पादक शेतकरी संकटात

टोमॅटोच्या भावात घसरण, उत्पादक शेतकरी संकटात 

बाजारसमितींमध्ये टोमॅटोचा भावात सतत घसरण होत आहे. टोमॅटोचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांपुढे टोमॅटो फेकुन देण्याची वेळ आली आहे. 

सध्या बाजारसमितींमध्ये टोमॅटोला सरासरी दर हा ७०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज १ मे रोजी टोमॅटोला राहता बाजारसमितीत सरासरी दर हा ७०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ४३ क्विंटल टोमॅटोची आवक झालेली असुन कमीतकमी दर हा ५०० ते जास्तीत जास्त दर हा ९०० रूपये मिळाला आहे. 

पुणे-पिंपरी बाजारसमितीत लोकल टोमॅटोला सरासरी दर हा १२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत सरासरी दर हा १ हजार ते जास्तीत जास्त दर हा ४ हजार रुपये क्विंटल मिळाला असुन या बाजारसमितीत २३ क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. टोमॅटोला कमीतकमी दर हा ७०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत प्रतिकिलो भाव हा १६ रूपये किलोप्रमाणे मिळाला आहे.