new-img

टोमॅटो दर शंभरी पार,उत्पादक शेतकरी आनंदात

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मे महिन्यापासून चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
सध्या घाऊक बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो भाव हा १०० ते १२० रुपये मिळत आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात टोमॅटोच्या किंमती ८० ते १०० रुपये प्रति किलोदरम्यान आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टोमॅटोचा भाव ९० ते ९५ रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. सध्या बाजारसमितीत टोमॅटोची आवक ही फार कमी झाली आहे त्यामुळे टोमॅटोला चांगला भाव हा मिळत आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केली आहे. मुंबईत टोमॅटोचे दर हे १०० ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोचे किरकोळ दर हे ९० रुपये किलोवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात टोमॅटो ३० रुपये किलोने विकला जात होता, तिथे आता टोमॅटो ९० रुपये किलो झाला आहे.
टोमॅटोला समाधानकारक असा भाव सध्या मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत.