new-img

टोमॅटोला मिळतोय ६५०० रूपयांचा भाव

गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भावात सुधारणा आली आहे. टोमॅटोचे भाव या आठवड्यात चांगलेच वाढले आहेत. टोमॅटोला समाधानकारक असा दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारसमितींमध्ये टोमॅटोला सरासरी भाव हा ६५०० रूपयांपर्यंत मिळत आहे.  
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार १८ जुलै २०२४ रोजी टोमॅटोचे भाव हे ६५०० रूपये पर्यंत पोहोचले आहे. मुंबई बाजारसमितीत नं १ टोमॅटोला बाजारभाव हा सरासरी ६५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. जळगाव बाजारसमितीत सरासरी टोमॅटोला भाव हा ६५०० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. पुणे बाजारसमितीत टोमॅटोला सरासरी भाव हा ४५०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. सर्वात कमी दर हा श्रीरामपूर बाजारसमितीत १००० रूपये मिळाला आहे. बाजारअभ्यासकांच्या मते पुढील काळात टोमॅटोची आवक ही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.