new-img

लासूर स्टेशन बाजार समिती बनणार डिजिटल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच डिजिटल होणार आहे. शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप सॉफ्टवेअर अर्थात बंतोष प्रणालीचा वापर या बाजारसमितीत केला जाणार आहे. बंतोष ॲपच्या माध्यमातून लासूर स्टेशन बाजार समितीतील बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन होणार आहेत.
राज्यातील अन्य  बाजारसमिती जसे की मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, मालेगांव, नामपूर, कोपरगाव, अमळनेर, अकलुज, वैजापूर, पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत डिजिटल झाल्या आहेत. अगदी त्याचप्रमाणे लासूर स्टेशन बाजार समिती देखील लवकरात लवकर डिजिटल होणार आहे. गंगापूर चे आमदार मा.श्री.प्रशांत बन्सीलाल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती मा.श्री. शेषराव भावराव जाधव, उपसभापती मा.श्री. अनिल राजाराम पा. चव्हाण., सर्व संचालक मंडळ आणि सचिव मा.श्री. श्री. गंगाधर रामभाऊ निमसे यांच्या पुढाकाराने लासूर स्टेशन बाजार समिती ही आता डिजिटल होणार आहे.
लासूर स्टेशन बाजार समितीच्या पदाधिकारी, संचालक मंडळाने बंतोष प्रणालीच्या माध्यमातून वैजापूर बाजार समितीत सुरु असलेले कामकाज पाहिले. त्यासोबत राज्यातील अन्य बाजार समितीत सुरु असलेले कामकाज देखील पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्ये बंतोष प्रणालीद्वारे व्यवहार सुरु व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील इतर बाजारसमित्याप्रमाणे लासूर स्टेशन बाजारसमिती देखील डिजिटल बनणार आहे. 
बंतोष प्रणालीच्या माध्यमातून एकीकडे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाचा भाव समजतो. तर दुसरीकडे शेतकरी, मापाडी, खरेदीदार, आडतदार ह्यांना बंतोष प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे रेकॉर्ड ऑनलाईन ठेवणे सोपे जाते. बंतोषच्या मोबाईल ॲपमधून बाजार समितीचे व्यवहार डिजिटल होत असल्याने बाजार समित्यांकडून ह्या प्रणालीचा स्विकार होत आहे. मोबाईल ॲपद्वारे होणाऱ्या पावत्या, थर्मल प्रिंटरद्वारे हातोहात मिळणारी पावती, तसेच घरबसल्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर मिळणारे अपडेट्स ह्यामुळे बंतोष ॲप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बंतोष प्रणालीचा आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी घरबसल्या फायदा घेतला आहे. त्यासोबत बाजारसमितींना देखील बंतोष प्रणालीचा फायदा होत आहे. याचाच विचार करून लासूर स्टेशन देखील आता लवकरात लवकर डिजिटल होणार आहे.