new-img

हिंगोली कृषी उत्पन्न बाजारसमिती ९ दिवस बंद, भावात काहीशी सुधारणा

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोंढा बाजार नऊ दिवस बंद राहणार आहे. भुसार माल विकण्यासाठी २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत नऊ दिवस मोंढ्यातील खरेदी- विक्री बंद राहणार आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  शेतमालाची आवक घटली होती. पण आता ९ दिवस मोंढा हा बंद असल्याने मागील दोन दिवसांपासून हिंगोलीत हळदीची आवक काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून  हळदीच्या भावात घसरण  झाली होती. हिंगोलीत आता नऊ दिवस मोंढा बंद राहणार असल्याने हळदीची आवक वाढली आहे व दुसरीकडे क्विंटलमागे मिळणाऱ्या हळदीच्या भावात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार हिंगोली कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये २२ जूलै रोजी हळदीला सरासरी भाव हा १४३०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमिती ३००० क्विंटल हळदीची आवक झाली आहे. कमीतकमी दर बाजारसमितीत १३१०० रूपये मिळत असुन या बाजारसमितीत जास्तीत जास्त बाजारभाव हे १५५०० रूपये मिळत आहे. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे.