new-img

हिरव्या मिरचीच्या आवकेत घट, दरात तेजी

हिरव्या मिरचीच्या आवकेत घट, दरात तेजी

सध्या बाजारसमितींमध्ये हिरव्या मिरचीची आवक ही घटली आहे. त्यामुळे दरात सुधारणा आली आहे. हिरव्या मिरचीला बाजारसमितीत सर्वाधिक भाव हा ५५०० रूपये मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार ३०-०७-२४ रोजी मिरचीला सर्वीधिक भाव ५५०० रूपये मिळाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत मिरचीला हा भाव हा मिळाला आहे. या बाजारसमितीत आज ३० जुलै रोजी आवक ही ११६२ क्वि्ेटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी भाव हा ५ हजार ते जास्तीत जास्त भाव हा ६ हजार रूपये मिळाला आहे. कामठी बाजारसमितीत मिरचीला सरासरी भाव हा ५ हजार रूपये मिळाला आहे. सर्वात कमी सरासरी बाजारभाव हा छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत मिळाला असुन या बाजारसमितीत मिरचीला कमीतकमी भाव हा १५०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ७८ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक ही झालेली आहे. बाजारसमितींमध्ये हिरव्या मिरचीला सरासरी बाजारभाव हा १५०० ते ५५०० रूपयांच्या दरम्यान मिळत आहे. बाजारात मिरचीची आवक कमी झालेली असुन दरात तेजी ही आलेली आहे.