new-img

सोयाबीन आवकेत वाढ, दरात घसरण

सोयाबीन आवकेत वाढ, दरात घसरण

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आले आहेत आहेत. राज्यात सोयाबीनची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार १ ऑगस्ट २०२४ रोजी बाजारसमितींमध्ये सोयाबीनला सरासरी दर हा ४१०० ते ४५०० रूपयांच्या दरम्यान मिळाले आहेत. अमरावती बाजारसमितीत १९६२ क्विंटल सोयाबीन ची आवक झाली आहे. सोयाबीनला या बाजारसमितीत सरसरी दर हा ४१५६ रूपये मिळाला आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची आवक ही १८०० क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर हा ४२०० रूपये मिळाला आहे. कारंजा बाजारसमिती आज सोयाबीनची आवक १५०० क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर हा ४१८० रूपये मिळाला आहे.
सोयाबीनला योग्य भाव मिळावा या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवली होती. आता शेतकरी बाजारसमितीमध्ये सोयाबीन विकण्यासाठी नेत आहे. बाजारअभ्यासकांच्या मते पुढील काही दिवस सोयाबीन बाजाराची अशीच स्थिती राहणार आहे.