new-img

कृषी निर्यात क्लस्टरवर 18000 कोटींची गुंतवणूक करणार - कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

कृषी निर्यात क्लस्टरवर 18000 कोटींची गुंतवणूक करणार - कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार शेतीसाठी 100 निर्यात क्लस्टर तयार करण्यासाठी 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत दिली आहे. केंद्रिय कृषीमंत्र्याच्या या निर्णयाने देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा हा होणार आहे.
यावेळी बोलतांना शिवराज सिंह चौहान म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांची डिजिटल ओळख दिली जाईल, त्यासाठी सरकार काम करत आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. विरोधक शेतकऱ्यांना व्होट बँक मानत असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात कोणतीही समस्या नाही, असे कोण म्हणत असले तरी त्यावर उपायही आहेत. 
यावेळी कडधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी सरकारनं 6800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डाळी अभियानाची योजना आखली आहे. हवामान अनुकूल कृषी प्रणाली बनवली जात आहे. सरकार देशभरात 50,000 हवामान अनुकूल गावे वेगाने विकसित करत आहे. याशिवाय बियाणांच्या 1500 नवीन जाती विकसित केल्या जात असल्याचे चौहान म्हणाले. त्यामुळे या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.