new-img

पुणे बाजारात कांद्याला काय मिळतोय बाजारभाव?

पुणे बाजारात कांद्याला काय मिळतोय बाजारभाव?

बाजारसमितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी काहीसा समाधानकारक असा दर मिळत आहे. पुणे बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव हा २३०० रूपयांपर्यंत मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार पुणे बाजारात ८ ऑगस्ट २०२४ रोजी कांद्याला सरासरी बाजारभाव २३०० रूपये मिळाला आहे. कमीतकमी भाव हा १५०० ते जास्तीतजास्त भाव हा ३१०० रूपये मिळाला असुन या बाजारमसमितीत १०३७९ क्विंटल कांद्याची आवक ही झाली आहे. पुणे-पिंपरी कृषी उत्पन्न बाजारसमितीत सरासरी २६०० रूपये बाजारभाव हा मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी भाव हा २२०० ते जास्तीतजास्त भाव हा ३००० रूपये मिळाला असुन या बाजारमसमितीत ६ क्विंटल कांद्याची आवक ही झालेली आहे. पुणे-मोशी बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा २१५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा १५०० रूपये जास्तीत जास्त भाव हा २८०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याची आवक ही ६०२ क्विंटल झाली आहे.