new-img

बांगलादेशातील अराजकतेचा कांदा, हळद निर्यातीला फटका

बांगलादेशातील अराजकतेचा कांदा, हळद निर्यातीला फटका

बांगलादेशातील अराजकतेमुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा, हळदीच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचं समोर येत आहे.
भारतातील मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात बांग्लादेशला होत असते. कुठेतरी बऱ्याच दिवसानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला काहीसा समाधानकारक भाव हा मिळत होता. पण आता पुन्हा भावावर परिणाम होऊ शकतात. नाशिक येथील लासलगाव मधून मोठ्या प्रमाणात कांदा हा बांगलादेशला रवाना होत असतो. जवळपास दररोज जरी म्हणले तरी 80 ट्रक बांगलादेशला रवाना होत असतात. परंतु आता सिमा सिल झाल्याने नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातून दररोज साधारण १५० टन हळदीची बांगलादेशात निर्यात होत असते. मात्र आता बांगलादेशात आलेल्या अराजकतेमुळे  हळद निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे.  बांगलादेशात हळद निर्यात करायची की नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.