new-img

हरभऱ्याला मिळतोय बाजारसमितीत समाधानकारक दर

हरभऱ्याला मिळतोय बाजारसमितीत समाधानकारक दर
गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याला चांगला दर हा बाजारसमितीत मिळत आहे. बाजारात हरभऱ्याची आवक ही घटली असुन दराला चांगला आधार मिळाला आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १० ऑगस्ट रोजी बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी समाधानकारक असा दर हा मिळत आहे. पुणे बाजारमसमितीत ४२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ७००० ते जास्तीत जास्त दर हा ८००० ते सरासरी दर हा ७५०० रूपये मिळाला आहे. बीड बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी बाजारभाव हा ६३८० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी आवक ही ६ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी भाव हा ५५०१ रूपये मिळाला असुन जास्तीतजास्त भाव हा ६८५० रूपये मिळाला आहे. गेवराई कृषी उत्पन्न बाजारसमिती हरभऱ्याला सरासरी बाजारभाव हा ७००० रूपये मिळाला असुन या बाजारमसमितीत कमीतकमी दर हा ६२४० जास्तीतजास्त दर हा ७०५१ रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत २९ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे.