new-img

सोयाबीन आवक घटली, किती मिळतोय दर?

सोयाबीन आवक घटली, किती मिळतोय दर?

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीन समाधानकारक असा दर हा बाजारसमितीत मिळत नाही. सध्या बाजारसमितीत सोयाबीनची आवक ही घटलेली आहे. तरीही अपेक्षित असा दर हा मिळत नसतांना पाहायला मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळणारे भाव हे घसरले आहेत. १६ ऑगस्ट रोजी उमरगा कृषी उत्पन्न बाजारसमितीत पिवळा सोयाबीनची आवक सर्वात कमी झाली आहे. या बाजारसमितीत केवळ १ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. या बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ४१०० रूपये भाव हा मिळाला आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजारमसमितीत सोयाबीनची आवक ही ३ क्विंटल झाली असुन या बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी बाजारभाव हा ४००५ रूपये प्रतिक्विंटल झाली आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची आवक ही आज ७ क्विंटल झाली आहे. या बाजारात सोयाबीनला सरासरी भाव हा ४०५० रूपये बाजारभाव हा मिळाला आहे.