new-img

हरभरा उत्पादनात घट, दरात सुधारणा

हरभरा उत्पादनात घट, दरात सुधारणा

शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारसमितीत समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. यंदा हरभरा उत्पादन घटल्याने बाजारात 
मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २६ ऑगस्ट २०२४ रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत सरासरी हरभऱ्याला दर ७२०० रूपये मिळाला आहे. कमीतकमी दर ६२६५ जास्तीतजास्त दर ७६१० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत १२९ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. २५ ऑगस्ट २०२४ बुलढाणा बाजारसमितीत लाल हरभऱ्याला सरासरी बाजारभाव ६५०० रूपये मिळाला आहे. कमीतमकमी भाव हा ६००० ते जास्तीतजास्त भाव हा ७००० मिळाला असुन या बाजारसमितीत १६ क्विंटल हरभऱ्याची आवक झालेली आहे. अहमहदनगर बाजारसमितीत ५ क्विंटल हरभऱ्याची आवक झालेली असुन या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ६००० ते जास्तीतजास्त दर ७००० तर सरासरी दर हा ६००० रूपये मिळाला आहे. २४ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर ७६०० रुपये मिळाला आहे. 
बाजारसमितीमध्ये हरभऱ्याला सरासरी बाजारभाव हा ६७०० ते ७३०० रूपयांच्या दरम्यान बाजारभाव हा मिळत आहे. आवक कमी झाल्याने दराला बाजारसमितीमध्ये आधार मिळाला आहे.