new-img

अमरावती बाजारसमितीत सोयाबीनला ४३०० रूपये बाजारभाव

अमरावती बाजारसमितीत सोयाबीनला ४३०० रूपये बाजारभाव

गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २७ ऑगस्ट २०२४ रोजी अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी बाजारभाव ४२८१ रूपये मिळाला आहे. कमीतकमी भाव ४२५० रूपये मिळाला असुन जास्तीतजास्त बाजारभाव ४३१३ रूपये मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी बाजारभाव ४२२० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ४२०० रूपये मिळाला असुन जास्तीतजास्त दर ४२४१ रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत १८ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. तुळजापूर  कृषी उत्पन्न बाजारसमितीत ४० क्विंटल सोयाबीनची आवक झालेली असुन या बाजारसमितीत सरासरी बाजारभाव ४३२५ रूपये मिळाला आहे. 
केंद्र सरकारने आगामी खरीप पणन हंगामासाठी सोयाबीनचा एमएसपी ४८५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे, तर सध्या साठवून ठेवलेल्या सोयाबीनला शेतकऱ्यांना सध्या १००० ते १३०० रुपये प्रति क्विंटलचा थेट तोटा सहन करावा लागत आहे. सोयाबीनचे भाव सध्या ३५०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.