new-img

कामठी बाजारसमितीत कांद्याला सर्वाधिक भाव

कामठी बाजारसमितीत कांद्याला सर्वाधिक भाव

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला ४५०० रूपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळतो आहे. सध्या काही बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याला बाजारसमितीत सरासरी दर २८००  ते ४२५० रूपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार कामठी कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे . या बाजारसमितीत कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव ४५०० रूपये भाव मिळाला आहे.  कमीतकमी दर ३५०० ते जास्तीतजास्त दर ४५०० रूपये मिळाला आहे.  सरासरी दर ४००० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत १० क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. पिंपळगाव बसवंत बाजारमसमितीत १०८०० क्विंटल कांद्याची आवक झाली असुन या बाजारसमितीत सरासरी दर ३८०१ रूपये मिळाला आहे. लासलगाव - विंचूर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची ३५०० क्विंटल आवक झालेली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर २००० ते जास्तीतजास्त दर ३९०१ सरासरी दर ३७५० रूपये मिळाला आहे.  
सध्या बाजारसमितींमध्ये सर्वात कमी दर हा १००० रूपयांपासून मिळत आहे. तर जास्तीतजास्त दर ४५०० रूपयांपर्यंत मिळत आहे.