new-img

यंदा पशुगणनेत होणार मोबाईलचा वापर

यंदा पशुगणनेत होणार मोबाईलचा वापर
यंदा सप्टेंबरपासून २१व्या पशुगणनेसाठी पशुविभाग सज्ज झाला आहे. या वेळी सर्व प्रकारच्या पशुधनाची गणना प्रगणक व पर्यवेक्षक मोबाइलवरून करणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने यावर्षी मोबाईलच्या माध्यमातून होणारी ही पशुगणना चार महिने चालणार आहे.  यासाठी  प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असुन लवकरच पशुगणना सुरू होईल, पशुगणनेसाठी पुर्ण पेपरलेस असलेल्या या प्रशिक्षणासाठी प्रगणकांना प्रशिक्षित केले असुन तांत्रिक अडचणी दुर झाल्या की लवकरच पशुगणना सुरू होणार आहे.