new-img

बाजार समितीकडून व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार काटा पावती

कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर आणि बंतोष अ‍ॅग्री फिनटेक प्रा. लि. यांच्या सहकार्याने मापाडी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये बंतोषचे अधिकारी आणि बाजार समितीकडून मापाडी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

मंचर इथे तरकारी व कांदा आवक मोठया प्रमाणावर होते. बाजार आवारात आलेल्या शेतमालासोबत शेतकरी लिलावात उपस्थित राहत नसल्यामुळे आपले शेतमालास किती बाजारभाव मिळाला हे त्यांना घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे. तसेच विक्रीची रक्कम बँक खात्यावर जमा करण्याची सोय देखील या प्रणालीद्वारे होणार आहे.