new-img

कांदा अनुदानाबाबत अपात्र शेतकऱ्यांना दिलासा

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद असल्याकारणाने अपात्र ठरलेल्या अर्जाबाबत सकारात्मक निर्णय घेणाच्या सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत दिल्या. सदर बैठकीत अनुदानापासून वंचित राहिलेल्या कांदा उत्पादकांना अनुदान मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील 2 हजार 878 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे वळसे-पाटील यांनी आश्वासित केले.