new-img

कांदा उत्पादकांना दिलासा

कांद्याचे बाजार भाव वाढत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली. मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (दिनांक 13 ऑगस्ट) कांद्याला प्रति दहा किलोला उच्चांकी 325 रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात प्रति दहा किलोला 270 ते 280 रुपयापर्यंतच बाजार भाव मिळत होता.

कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. मंचर बाजार आवारात खेड व शिरूर तालुक्यातून प्रामुख्याने कांद्याचे आवक होत असते. अधिक मास महिना संपल्याने व श्रावण महिना सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे.