new-img

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार काटा पावती

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार नारायणगाव इथे 'बंतोष ॲप'मुळे सर्व व्यवहार हे डिजिटल अर्थात ऑनलाईन होत आहेत. परिसरातील शेतकरी बंतोष ॲपच्या मदतीने आपला शेतीमाल बाजारात पाठवत आहे. अशावेळी मापाडी किंवा आडतदार यांनी केलेल्या पावत्या देखील ऑनलाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या व्हॉट्सॲपवर काटापावती किंवा अंतिम हिशोब पावती मिळत आहे.