new-img

राहुरी बाजार समितीच्या शिष्टमंडळाची मंचर बाजार समितीला भेट

राहुरी बाजार समितीच्या शिष्टमंडळाची मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट, 'बंतोष'च्या वापराने पाहुणे प्रभावित!

'बंतोष ॲप'मुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचली आहे. मंचर बाजार समितीतील ह्या बदलाबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच मंचर बाजार समितीला भेट दिली.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती (जि. अहमदनगर) यांच्या शिष्टमंडळाने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीला (जि. पुणे) भेट दिली. यावेळी राहुरी बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी आणि काही अधिकारी उपस्थित होते. तर, मंचर बाजार समितीचे सचिव, उपसभापती, संचालक मंडळ आदीजण यावेळी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या कामाबद्दल, कार्यप्रणालीबद्दल आणि अन्य बाबींबद्दल विस्तृत चर्चा झाली.

मंचर बाजार समिती हि राज्यातील एक प्रगतशील आणि डिजिटल बाजार समिती आहे. मागील चार ते पाच वर्षात बाजार समितीने चांगलीच प्रगती साध्य केली आहे. त्यातही मागील एक वर्षात बाजार समितीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. या सर्वात बाजार समितीच्या दररोजच्या व्यवहारासाठी वापरात असलेले बंतोष ॲप महत्वाचे ठरत आहे. वापरायला सोपे आणि व्यवहारासाठी सुरक्षित असलेल्या या ॲपमुळे मंचर बाजार समितीत गुणात्मक बदल झालेत. ह्या सर्व प्रक्रियेला पाहून राहुरी बाजार समितीचे शिष्टमंडळ देखील प्रभावी झाले.

राहुरी बाजार समितीकडून भिकादास जरे (सचिव), गोरक्षनाथ पवार (उप सभापती) महेश पानसरे (संचालक) भाऊसाहेब खेवरे (संचालक) बाळासाहेब खुळे (संचालक) मारूती हर्बे (संचालक) तसेच मापाडी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. तर, मंचर बजार समितीकडून सचिन बोऱ्हाडे (सचिव), सचिनभाऊ पानसरे (उप सभापती), संचालक आणि आडतदार उपस्थित होते.