new-img

राहुरी बाजार समिती लवकरच डिजिटल

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच डिजिटल होणार आहे. बंतोष ॲपच्या माध्यमातून राहुरी बाजार समितीतील बहुतांश व्यवहार हे आता ऑनलाईन होणार आहेत. राहुरी बाजार समितीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे अभ्यास दौरा केला होता. त्या भेटीवेळी मंचर बाजार समितीत बंतोष ॲपद्वारे होणारे व्यवहार पाहून राहुरीचे शिष्टमंडळ खुष झाले होते.

'बंतोष ॲप'मुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचली आहे. मंचर बाजार समितीतील ह्या बदलाबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच मंचर बाजार समितीला भेट दिली होती. राहुरी बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी आणि काही अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. मंचर बाजार समितीच्या कार्यप्रणालीबद्दल समजून घेताना बंतोष ॲपच्या बद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली.

राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण बाबुराव तनपुरे, उपसभापती गोरक्षनाथ तुकाराम पवार, सचिव भिकादास जरे, आणि संचालक मंडळ, मापाडी, आडतदार, व्यापारी प्रतिनिधी ह्या सर्वांनीच बंतोष ॲपची सिस्टम आपल्याही बाजार समितीत असावी, ह्यावर विचार करुन एकमत केले. बंतोषच्या अधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना भेट घेऊन बंतोष प्रणालीची विस्तृत माहिती दिली आणि त्याचे फायदे सांगितले, अखेर ह्या प्रणालीच्या वापरावर शिक्कामोर्तब होऊन अखेर आता ती राहुरी बाजार समितीत राबवली जाणार आहे.

बंतोषची रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम ह्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला मिळालेला भाव समजतो. तर दुसरीकडे शेतकरी, ट्रान्सपोर्टर, मापाडी, आडतदार आदी सर्वांसाठी हे ॲप फायदेशीर आहे. मोबाईल ॲपद्वारे होणारे टोकण, पावत्य, थर्मल प्रिंटरद्वारे मिळणारी पावती, तसेच व्हॉट्सअपवर मिळणारे अपडेट्स ह्यामुळे बंतोष ॲप अत्यंत प्रभावी ठरत आहे. ही प्रणाली आपल्या बाजार समितीत असावी, हे ठरवूनच राहुरी बाजार समितीने आता बंतोष ॲग्री फिनटेक कंपनीसोबत करार केला असून लवकरच बाजार समितीत हे ॲप कार्यान्वित होईल.