new-img

मंचर बाजार समितीने गाठले प्रगतीचे नवे शिखर

पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख आणि योग्यरित्या प्रगतीच्या मार्गार असलेली बाजार समिती म्हणून मंचर बाजार समितीचा नावलौकीक आहे. मात्र मंचर बाजार समितीचा हा नावलौकिक होण्यात अनेक कारणे आहे, ज्यात बाजार समितीचे झालेले डिजिटलायझेशन ही एक बाब आहे. मंचर बाजार समिती ही महाराष्ट्रातील डिजिटल व्यवहार करणारी पहिली बाजार समिती आहे. बंतोष ॲप प्रणालीद्वारे मंचर बाजार समिती ही डिजिटल बनली असून त्यामुळे बाजार समिती प्रगतीच्या नव्या शिखरावर आहे.

बंतोष ॲपच्या साथीने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रगतीचे नवीन शिखर गाठले आहे. रेकॉर्डनुसार मागील वर्षी 2022-2023 मध्ये मंचर बाजार समितीची वाढावा राशी ही तब्बल 53096112 रुपये इतकी आहे. परंतू फक्त 2022-2023 याच वर्षातील नाही तर मागील तीन-चार वर्षांपासून मंचर बाजार समिती ही सातत्याने नफ्यात आहे, ह्याचे कारण मागील 5 वर्षांपासून बाजार समितीत बंतोष ॲपच्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत.

बंतोष ॲपमुळे घरबसल्या शेतमालाची विक्री शक्य, ऑनलाईन व्यवहारामुळे फसवणूक शुन्य, पावत्या संभाळण्याचा त्रास नाही ह्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. तर दुसरीकडे व्यवहारात पारदर्शकता, आर्थिक नफ्यात वाढ शक्य, मनुष्यबळाची गरज कमी, कागदांच्या ढिगाऱ्यापासून सुटका ह्यामुळे बाजार समितीला मोठा फायदा होत आहे. मागील तीन वर्षांच्या आवक-जावक खर्च ह्यांतील तफावत पाहता मंचर बाजार समितीच्या नफ्यात सातत्याने वाढ होत असून गेल्या वर्षी तर विक्रमी वाढावा राशी ही तब्बल 53096112 रुपये इतकी आहे.

आर्थिक वर्ष (अनुक्रमे)
2022-2023
2021-2022
2020-2021

उत्पन्न (रु.) (अनुक्रमे)
105282410
110917714
100088286

खर्च (रु.) (अनुक्रमे)
52186298
60232408
54817885

वाढवा/तुट (रु.) (अनुक्रमे)
53096112
50685306
54270401