new-img

पारनेर बाजार समिती हायटेक होणार

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंतोष ॲप प्रणालीमुळे अनेक गोष्टी ह्या ऑनलाईन होत आहेत. मागील पाच वर्षांपासून बंतोष ॲप मंचर बाजार समितीत कार्यरत असून यामुळे बाजार समितीने प्रगतीचा नवा उच्चांक गाठला आहे. अगदी ह्याच धर्तीवर आता पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती देखील हायटेक होणार आहे.

"पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणल्यानंतर अडत्याकडे वजन झाल्यानंतर त्याची नोंद संगणकात होऊन लगेचच त्याची पावती संबंधित शेतकरी, अडतदार, मापाडी यांच्या नावांसह शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच तसा एसएमएस देखील संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर व बाजार समिती कार्यालयाकडे त्याच क्षणी जाणार आहे."

या उपक्रमामुळे पारनेर बाजार समितीचा कारभार अगदी मंचर बाजार समितीप्रमाणे हायटेक व पारदर्शी होणार आहे.